DCM Devendra Fadnavis Office News:  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये तोडफोड, अज्ञात महिलेचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

DCM Devendra Fadnavis Office News: सुरक्षेसाठी पुरुष पोलीस तैनात असल्याने संंबंधित महिलेला पकडू शकले नाहीत. या महिलेने कार्यालय परिसरातील कुंड्या फेकल्या तसेच आरडाओरडा करत गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे| मुंबई, ता. २७ सप्टेंबर

DCM Devendra Fadnavis Office Vandalize: राज्यात विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. २६ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्रालयातील ऑफिसची तोडफोड

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ऑफिस आहे. गुरुवारी सायंकाळी एका अज्ञात महिलेने या कार्यालयाची तोडफोड करण्याचा तसेच कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

अज्ञात महिलेने घातला गोंधळ

धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालय परिसरात प्रवेश मिळवण्यासाठी पास लागतो. मात्र या महिलेने पास न काढता सचिव गेटद्वारे आतमध्ये प्रवेश केला. यावेळी सुरक्षेसाठी पुरुष पोलीस तैनात असल्याने संंबंधित महिलेला पकडू शकले नाहीत. या महिलेने कार्यालय परिसरातील कुंड्या फेकल्या तसेच आरडाओरडा करत गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु असून कार्यालयाची तोडफोड का केली? याबाबतचा तपास सुरु आहे.

सुषमा अंधारेंची टीका..

दरम्यान, सचिव गेटद्वारे प्रवेश करुन महिलेने थेट उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गोंधळ घातल्याने मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरुनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मंत्रालयाच्या सुरक्षेवरुन गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची बातमी येतेय. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे. जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकिबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

कशी असते मंत्रालयातील प्रवेशाची प्रक्रिया?

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला प्रामुख्याने ४ गेट आहेत.

मुख्य गेट - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री

सचिव गेट- विभागीय सचिव

गार्डन गेट- आमदार, मंत्रालयातील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक

आरसा गेट - मंत्रालयीन कर्मचारी

मंत्रालयातील कर्मचार्यांना विभागाचे ओळखपत्र दाखवून प्रवेश असतो. कामानिमित्ताने येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आधार कार्ड आणि कोणत्या विभागात काम आहे याची माहिती विचारली जाते. त्यांच्यासाठी दुपारी २-५ या वेळेतच हा प्रवेश असतो. त्यांना पास देण्यात येतो. तर माध्यम प्रतिनिधींसाठी देखील मंत्रालयात ओळखपत्र दाखवून सकाळी ११ ते ५ ही वेळ आहे. त्यांनाही पास देण्यात येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT