Uddhav Thackeray and Raj Thackeray Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: तयारीला लागा! उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पण मनसेसोबतच्या युतीबाबत सस्पेन्स

Uddhav And Raj Thackeray Yuti: उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षातील गट अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. महापालिकेच्या सर्व जागांसाठी तयारी सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Bharat Jadhav

  • उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत.

  • उद्धव ठाकरे यांनी आज महापालिका निवडणुकांबाबत आढावा बैठक घेतलीय.

  • काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलीय. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू केलीय. उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र मनसेसोबत युती करायची की नाही? याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाहीये.

आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत युती करायची का नाही? याबाबत अजून सस्पेन्स कायम आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करायची का नाही, हे पक्ष ठरवेल, तुम्ही सर्व जागांसाठी तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी एमएमआर परिसरातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.

या आढावा बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. दरम्यान याआधी राज ठाकरेंनीही आपल्या कार्यकर्त्यांना अशाच प्रकारच्या सुचना दिल्या होत्या. ठाकरे सेनेसोबत युती करायची की नाही हे मी ठरवेल तुम्ही फक्त निवडणुकीच्या कामाला लागा,अशा सूचना राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. आता तीच रीघ ओढत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आज घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सर्व गट अधिकाऱ्यांना निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेत. मनसेसोबत युती करायची की नाही, हे पक्ष ठरवेल. मात्र तुम्ही कामाला लागा. महापालिका निवडणुकीबाबत प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टाळी देण्यास तयारी दर्शवली. सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्या आयोजित केला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपण एकत्र आल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा संदर्भातील आरक्षणाचा प्रश्नाचे उत्तर शिंदेंच देतील - राज ठाकरे

Guava For Health : प्रत्येक महिलेने खायला हवे हे एक फळ, त्वचा तर चमकदार होईलच रोगप्रतिकार शक्तीही वाढेल

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT