राजकारणात हालचालींना वेग! एकनाथ शिंदेंची दुसऱ्यांदा रात्री उशिरा दिल्लीवारी; नेमकं कारण काय?

Shinde’s Late-Night Delhi Tour: एकनाथ शिंदे यांचा आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा; रात्री उशिरा दिल्लीला रवाना. शिंदे गट खासदारांसोबत तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकांची शक्यता. अमित शहांसोबत भेटीची शक्यता पुन्हा चर्चेत.
Eknath Shinde
Maharashtra Politics Saam Tv
Published On
Summary
  • एकनाथ शिंदे यांचा आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा; रात्री उशिरा दिल्लीला रवाना.

  • शिंदे गट खासदारांसोबत तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकांची शक्यता.

  • अमित शहांसोबत भेटीची शक्यता पुन्हा चर्चेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाण्यापूर्वीच आज रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत. त्यांचा एका आठवड्यातील दुसऱ्यांदा दिल्ली दौरा असणार आहे. त्यांच्या या दौऱ्याला राजकीय तसेच प्रशासनिक पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (५ ऑगस्ट)ला रात्री उशिरा दिल्ली दौऱ्याला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजेच्या सुमारास दिल्लीमध्ये पोहोचतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत उद्या विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. तसेच शिवसेना शिंदे गटातील खासदारांसोबत इतर महत्वाच्या बैठकांमध्ये शिंदे सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde
मोठी बातमी! शिंदे गटातील नेत्याच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी ५ लाख रूपये घेताना रंगेहाथ पकडलं

या दौऱ्यादरम्यान, एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का? या भेटीदरम्यान, काय चर्चा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांनी रात्री ११ वाजता अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर चर्चेला उधाण आलं होतं.

Eknath Shinde
माझ्या बायकोशी अनैतिक संबंध, तुमची चॅटिंग व्हायरल करेल; IT कंपनी मालकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवार (७ ऑगस्ट) रोजी दिल्ली दौऱ्यावर जात असून, इंडिया आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तसंच ते आपल्या खासदारांसोबत स्वतंत्र बैठक घेणार असून, राहुल गांधींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही ते गुरुवारी हजेरी लावतील, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com