Sushma Andhare Saam Tv
मुंबई/पुणे

Sushma Andhare News: 'ससूनच्या डीनची नार्को टेस्ट करा अन्यथा रस्त्यावर उतरु...' ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारे आक्रमक

Maharashtra Politics News: या प्रकरणात मंत्री गिरिश महाजनांचाही समावेश असल्याचा मोठा आरोप सुषमा अंधारेंनी केला.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Sushma Andhare On Lalit Patil Case:

राज्यात सध्या ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव चांगलेच चर्चेत आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन समोर सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंवर गंभीर आरोप केले होते. यावरुन सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक खुलासे केले आहेत.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे...

"ललित पाटील प्रकरणात आम्ही आवाज उठवत आहोत पण गृहखाते आणि आरोग्य खात यावर लक्ष देत नाही. या प्रकरणात ललित पाटीलसह ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना सहआरोपी करा, तसेच या प्रकरणी नेमलेल्या समितीने संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा," अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसेच याप्रकरणी कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिली.

"गृहमंत्री साहेब आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली ओपन करावी हे आम्हाला माहिती आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे सांगू नका, मात्र ललित पाटीलवर काय उपचार सुरू होते, याची माहिती द्या.." असेही अंधारे म्हणाल्या.

"दादा भुसे यांचे नाव आम्ही घेतले आणि सगळ्यांनी आमच्यावर आरोप केले. मात्र नाशिकमध्ये एवढा मोठा कारखाना उभा कसा राहिला? याप्रकरणात पालकमंत्री देखील जबाबदार आहेत. अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का?" असे म्हणत या प्रकरणात मंत्री गिरिश महाजनांचाही समावेश असल्याचा मोठा आरोप सुषमा अंधारेंनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT