Shiv Sena And NCP MLA Disqualification Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार का? ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shiv Sena And NCP MLA Disqualification Case Supreme Court Hearing: आज सुप्रीम कोर्टात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे. दोन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार (Maharashtra Politics) आहे. दोन्ही सुनावण्या आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहेत. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट यांपैकी शिंदे गटाला बहुमत मिळाल्याने खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल दिला होता.

शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं (Shiv Sena And NCP MLA Disqualification Case) नाही, म्हणून ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही, म्हणून शरद पवार यांच्या पक्षाच्या जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातमधील फुटीनंतर आमदार अपात्रतेच्या मुद्दाचा निकाल अजून लागलेला नाही.

सुप्रीम कार्टात सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्याकडून ओरिजनल कागदपत्र मागितली होती. ही सुनावणी सुप्रीम कोर्टात नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात व्हावी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने न्यायालय काही महत्वाचे निर्देश देत का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार का?

पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबद्दल ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती. हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे कोर्टाने सोपवला होता. आज या प्रकरणी सुनावणी (Supreme Court) पार पडणार आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं? आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपलेली आहे, त्यामुळे याप्रकरणी लवकर निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT