Maharashtra Loksabha Election 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

South Mumbai Loksabha: दावा सोडा अन्यथा 'कमळा'वर लढा! दक्षिण मुंबईच्या जागेवरुन शिंदे गट- भाजपमध्ये रस्सीखेच; उमेदवारी कोणाला?

Maharashtra Loksabha Election 2024: दक्षिण मुंबईच्या जागेवरुन पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. दक्षिण मुंबईची जागा सोडण्याचा आग्रह भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार आहे.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, मुंबई|ता. ८ मार्च २०२४

South Mumbai Loksabha Election 2024:

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटत नसल्याची चिन्हे दिसत आहे. लोकसभेच्या अनेक जागांवरुन शिवसेना शिंदे गट तसेच भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता दक्षिण मुंबईच्या जागेवरुन पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. दक्षिण मुंबईची जागा सोडण्याचा आग्रह भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. (Loksabha Election 2024)

दक्षिण मुंबईच्या जागेवरुन रस्सीखेच...

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. मात्र अरविंद सावंत यांविरोधात असलेला रोष हा भाजपसाठी मदतीचा ठरणार आहे. तसेच मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबईची जागा सहज जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजप आग्रही आहे. परंतु, शिवसेनेचा मात्र ही जागा सोडण्यास नकार आहे.

उमेदवारी कोणाला?

दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा व यशवंत जाधव लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. तर भाजपचे राहुल नार्वेकर व मंगल प्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवार कुणीही असो, मात्र कमळावर लढवा, असेही भाजपचे म्हणणे आहे. कमळ चिन्हावर लोकसभा जिंकण्याची शक्यता अधिक असल्याने ही जागा भाजपकडून लढवण्याचा प्रस्ताव शिंदे गटाकडे दिला आहे. यावर आता शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण मुंबईसाठी भाजपचा हट्ट का?

विधानसभेत युती नसताना झालेल्या स्वतंत्र लढतीत भाजपने शिवसेनेहून अधिक मते घेतली होती. दक्षिण मुंबईत सध्या शिंदेच्या शिवसेनेसोबत केवळ एक आमदार असून दोन आमदार ठाकरे गटाकडे आहेत. याउलट भाजपचे दोन आमदार कार्यरत आहेत. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा जबरदस्त मोदी लाट दिसेल.

त्यामुळे भाजपसाठी दक्षिण मुंबईत पोषक वातावरण असेल. विशेषतः महिला व तरूणांवर असलेले नरेंद्र मोदींचे गारुड पाहता धनुष्यबाणाहून अधिक मते कमळाला मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेनेला उमेदवार द्यायचा असेल तर तो कमळ चिन्हावर द्यावा, अशी चाचपणी महायुतीत सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT