Mahayuti News : 'ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डेड', असा तो फॉर्म्युला; विजय वडेट्टीवार यांचा जागावाटपावरुन महायुतीवर निशाणा

VIjay Wadettiwar News : महायुतीमध्ये दोन्ही पक्षांचं स्थान नगण्य आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख हे भाजपमध्ये जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे बेइमानी करून हे पक्ष फोडले, असं
VIjay Wadettiwar
VIjay WadettiwarSaam Tv
Published On

Political News :

लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार, भाजप ३४, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४ अशा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन काँग्रेसने नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टिकास्त्र सोडलं आहे. (Lok Sabha Election 2024)

महायुतीमध्ये दोन्ही पक्षांचं स्थान नगण्य आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख हे भाजपमध्ये जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे बेइमानी करून हे पक्ष फोडले. ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डेड असा तो फॉर्मुला आहे उद्या शिंदे गट आणि पवार गट या दोघांचाही अंत निश्चित आहे. यांच्या हातात मूळ गिळून गप्प बसल्याशिवाय काही नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

VIjay Wadettiwar
Akhilesh Yadav Viral Video : 'नेताजी, नोकरी मिळत नाहीय, पेपर लीक होतायेत'; तरुणांंच्या प्रश्नाला अखिलेश यादवांनी दिलेलं उत्तर व्हायरल

शिवसेना-राष्ट्रवादील दयेवर जगाव लागेल. भाजप कधीच प्रादेशिक पक्षाला मोठं होऊ देत नाही. भाजप 35 नाहीतर 40 जागा लढवेल यात नवल वाटण्यासारखं काही नाही, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. (Latest News)

VIjay Wadettiwar
Bharat Jodo Nyay Yatra: पंतप्रधान मोदींनंतर राहुल गांधींनी तरुणांना दिली ५ गोष्टींची गॅरंटी; नोकरीसह देणार 'या' गोष्टी

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या चार-पाच दिवसात घेण्यात येईल. तिन्ही पक्षाचा फॉर्म्युला ठरला आहे. वंचितबरोबर सीट शेअरींगचा विषय आहे. समाधान होईल अशी तयारी केलेली आहे. महाविकास आघाडीचे चारही पक्ष संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावं लागेल तेवढ्या आघाडी करावी लागेलं, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळणार का?

तिकीट मागण्याचा अधिकार पक्षात प्रत्येकालाच आहे. देण्याचा अधिकार हा हायकमांडचा आहे. हायकमांड जो निर्णय घेईल तो अंतिम राहील. कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा अहित होणार नाही, अशी भूमिका घेणार नाही हे आम्ही ठरवलं आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत माझी उमेदवारी निश्चित केल्यानंतर सुद्धा मीच होतकरू असणाऱ्या बाळू धानोरकर यांना समोर केलं. मी नेता होतो. त्यावेळेस त्यांना पक्षात आणून अहोरात्र काम केलं. भविष्यात ज्याला तिकीट मिळेल त्यासाठी तितकेच मेहनत करू, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com