Cm Eknath Shinde on Aditya Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: विकासावर बोला, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका; आदित्य ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरुन शिंदे गटाचे टीकास्त्र

Kalyan News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. ९ फेब्रुवारी २०२४

Kalyan Politics News:

उबाठा गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला पण कुणी माणसं उरणार नाहीत, कार्यकर्ते सापडत नाहीत म्हणून पक्ष नेतृत्वाला कल्याण डोंबिवली ठाण मांडून बसावं लागतंय, आपण विकासावर बोलावं सँडविच आणि कॉफीवर बोलून त्यांना सहानुभूती मिळवण्याचा काम करू नये अशी टीका शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

आदित्य ठाकरेंचा कल्याण दौरा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. काल आदित्य ठाकरे यांनी कोळशेवाडी शहर शाखेत आयोजित केलेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती.शिवसेना युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी केलं जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

शिंदे गटाचे टीकास्त्र...

"उबाठा गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला पण कुणी माणसं उरणार नाहीत. उबाठा गटाला शोधून कार्यकर्ते सापडत नाहीत म्हणून पक्ष नेतृत्वाला कल्याण डोंबिवली ठाण मांडून बसावं लागतंय. कालच्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी खोके,गद्दार या पलीकडे काहीच भाषण केलं नाही, विकासकामांवर बोलले नाहीत .आपण विकासावर बोलावं, सँडविच आणि कॉफीवर बोलून त्यांना सहानुभूती मिळवण्याचा काम करू नये, अशी टीका दिपेश म्हात्रे यांनी केली.

जनता शिंदेंच्या पाठीशी...

तसेच "कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलाय त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र नागरिक मुख्यमंत्री व खासदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

"कार्यकर्ते पोस्टर बॅनर मनापासून लावत असतात, कोणी त्यांना सांगत नाही. तीन तीन वेळा पक्ष नेतृत्वाला कल्याण लोकसभेमध्ये स्वतः यावे लागतेय, ते त्यांची जागा शोधण्याचा प्रयत्न करतायत कार्यकर्ते शोधूनसुद्धा सापडत नाहीत, असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT