Deputy CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राजकीय नेत्यांच्या घरात आता फक्त २ तिकिटं, घराणेशाहीवरून टीका वाढल्यानंतर शिंदेसेनेला शहाणपण

Maharashtra Local Body Election: बदलापुरमध्ये शिवसेना नेते वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील ६ सदस्यांना तिकीट दिल्यामुळे विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या टीकेनंतर आता शिंदेसेनेने मोठा निर्णय घेतला.

Priya More

Summary -

  • वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जणांना मिळालेल्या तिकिटांवरून शिंदेसेनेवर घराणेशाहीची टीका झाली

  • टीकेनंतर शिंदेसेना आणि भाजपने एक कुटुंब – दोन तिकिटं हा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला

  • या निर्णयामुळे पक्षांतर करणाऱ्या आणि गोतावळ्याला तिकीट मिळवणाऱ्या नेत्यांचे गणित बदलणार आहे

बदलापूरमधील शिंदेसेनेचे नेते वामन म्हात्रेच्या कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेना शिंदेगटावर जोरदार टीका होत आहे. विरोधकांनी शिवसेनेवर घराणेशाहीची टीका केली. या टीकेनंतर आता शिंदेसेनेला शहाणपण आले. या टीकेनंतर आता भाजप आणि शिंदेसेना सावध झाली आहे. एकाच घरात फक्त दोन सदस्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे गोतावळ्याला तिकिट मिळवून देण्याच्या आशेनं पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची आता अडचण होणार आहे.

वामन म्हात्रे यांच्या घरातील ६ सदस्यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदेसेनेवर विरोधाकांनी घराणेशाही होऊ लागली असल्याचे म्हणत सडकून टीका केली. अशातच आता कल्याण-डोंबिवलीसह इतर ठिकाणी त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी भाजप आणि शिंदेसेना हे दोन्ही पक्ष घेणार आहेत. एकाच घरात फक्त दोघांना उमेदवारी मिळू शकणार आहे. त्यामुळे स्वतः, पत्नी, मुलगा, सून, जावई अशा एकाच कुटुंबातील सर्वांना उमेदवारी मिळवून निवडणूक लढता येईल यासाठी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्यांना चाप बसणार आहे.

बदलापुरमधील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेना शिंदे गटाने वामन म्हात्रे यांच्या एकाच कुटुंबातील एक -दोन नाही तर तब्बल सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने प्रश्न उपस्थित झाले होते. वामन म्हात्रे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्यात आली होती. त्याचसोबत वामन यांचे भाऊ तुकाराम, मेहुणी उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतणे भावेश म्हात्रे यांना शिंदे गटाने नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती.

दरम्यान, वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी यापूर्वी महापालिका निवडणूक लढवली आहे. २०१५ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेने म्हात्रे कुटुंबातील चार सदस्यांना तिकिटे देण्यात आले होते. स्थानिक भाजप नेत्यांनी शिंदे गटाच्या या तिकीट वाटपाचा निषेध केला आहे आणि जोरदार टीका केली. आता वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील ६ सदस्यांना तिकीट देण्यात आल्यामुळे शिंदेसेनेला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उमेदवाराची रास कोणती? कशी असेल निवडणूक, भाग्य उजळणार की आणखी काही...वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Wednesday Horoscope: मकरसंक्रातीला या ४ राशींचं नशीब फळफळणार, कामात बढतीचेही योग; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

saunf jeera water: दिवसाची सुरुवात बडीशेप आणि जीरा पाणी पिऊन करण्याचे काय फायदे आहेत?

SCROLL FOR NEXT