Politics: 'उमेदवारी अर्ज माघारी घे, नाहीतर...', घरात घुसून महिला उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Amravati Crime: अमरावतीमध्ये आम आदमी पार्टीकडून नगरसेवकपदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या महिला उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून या महिला उमेदवाराची छेड काढण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आला.
Politics: 'उमेदवारी अर्ज माघारी घे, नाहीतर...', घरात घुसून महिला उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी|
Amravati Crime Saam tv
Published On

Summary -

  • अमरावतीत महिला उमेदवाराच्या घरी घुसून शिवीगाळ आणि छेड काढली

  • आपच्या महिला उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

  • 'उमेदवारी माघारी घे नाहीतर मारून टाकू', अशी दिली धमकी

  • चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू

अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये नगरसेवकपदाच्या महिला उमेदवाराला जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या महिला उमेदवाराची आधी छेड काढण्यात आली. नंतर त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 'निवडणुकीत कशाला उभी राहिली, ताबडतोब निवडणुकीतून माघार घे, अन्यथा मारून टाकू.', अशी धमकी या महिला उमेदवाराला देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे वातावरण थंडीतही तापू लागले आहे. अशातच चांदुर रेल्वे शहरातील एका प्रभागात आम आदमी पक्षाकडून नगरसेवक पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणात उरतलेल्या २२ वर्षीय महिला उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

एका व्यक्तीने घरात घुसून या महिला शिवीगाळ करत छेड काढण्यात आली. 'निवडणुकीत कशाला उभी राहिली?, ताबडतोब निवडणुकीतून माघार घे, अन्यथा मारून टाकेल.', अशी धमकी या महिला उमेदवाराला देण्यात आली. ही घटना २७ नोव्हेंबरला रात्री घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निवडणूक जवळ येत असतांना महिलेला अशा पद्धतीने धमकावणे हा राजकीय दडपशाहीचा अत्यंत निंदनीय आणि भ्याड प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला उमेदवारासह स्थांनिक नागरिकांनी केली आहे. या घनटेमुळे अमरावतीत जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com