महापौर निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ
संजय राऊत यांनी शिंदेसेनेसोबत युती नाकारली
भाजपसोबत पर्याय खुले असल्याचे दिले संकेत
संजय राऊत यांनी ठाकरे गटाची भूमिका केली स्पष्ट
२९ महानगर पालिकांच्या महापौर निवडीवरून सध्या राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला. त्यामुळे राजकारणात एक नवा ट्विस्ट आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ४ नगरसेवक हे देखील शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले. 'अस्थिरता असेल तर तिथे भाजपसोबत जाण्याचा विरार करू पण शिंसेदेसेनेसोबत जाणार नाही.', असं विधान संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर भाजप-ठाकरेसेनेच्या युतीचे संकेत त्यांनी दिल्याची चर्चा होत आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करत आम्ही शिंदेसोबत जाणार नाह असे सांगितले. ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदेंसोबतची युती आम्हाला मान्य नाही. आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा युतीच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो. जिथे अस्थिरता आहे तिथे आम्ही शिंदेसोबत कदापी जाणार नाही. तिथे काही पर्याय उपलब्ध असतील तर त्यासंदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील. पण परस्पर कुणी निर्णय घेणार नाही.'
कल्याण- डोंबिवलीतील राजकारणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, 'शहा- काटशहच्या राजकारणात नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये. राज ठाकरे यांना ही भूमिका मान्य नाही. ही गोष्ट त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आली. आमची भूमिका शिंदेंच्या बाबतीत कठोर आहे. तिथे भाजप आणि शिंदे मिळून महापौर बनवू शकत होते. इतरांना घेण्याची गरज नव्हती. त्यांना आम्ही निर्णय मागे घेण्यास नाही सांगणार. अंतर्गत चर्चा होईल. शिंदेंसोबतच्या युतीच्या अशा प्रस्तावना आम्ही केराची टोपली दाखवतो. आम्ही सोबत जाणार नाही.'
मनसे-शिंदेसेना युतीबद्दल संजय राऊत म्हणाले की, 'राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला. त्यांची विश्वासार्हता संपली आहे. विकास हा शब्द भोंदू आणि ढोंगी, विकास या शब्दावर आता बंदी आली पाहिजे. विकास हा शब्द मोदी आणि फडणवीसांच्या काळात विकास हा बदनाम झाला. गोडसे हा शब्द इनपर्लिमंटरी आहे. बाळासाहेबांचा आणि भाजपाचा काही संबंध नाही आणि शिंदेंचा देखील नाही. निवडून आलेला माल ताबडतोप बाजारात विकायला येतो. हे काचेच्या कपाटात लेबल लाऊन उभे आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.