Ajit Pawar-Sharad Pawar Alliance :
NCP (Ajit Pawar faction) MLA Shekhar Nikam speaking on the possibility of unity between both NCP factions.x

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

Ajit Pawar-Sharad Pawar Alliance : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी अजित पवार गटातील एका वरिष्ठ नेत्याने दोन्ही राष्ट्रवादी गटाबाबत मोठं विधान केलंय. यामुळे महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published on
Summary
  • जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीत हालचाली

  • अजित पवार गटातील आमदार शेखर निकम यांचं मोठं विधान

  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ताकद वाढेल असा दावा

अमोल कलये, साम प्रतिनिधी

राज्यात महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. कुठे युती पहायला मिळाली तर कुठे मित्र पक्षांमध्येच धुसफूस पाहायला मिळाली. अशातच आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील बड्या नेत्याने मोठं विधान केलं आहे. चिपळूणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नामांकित आमदार शेखर निकम यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एकत्र येण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यास पक्षाची ताकद वाढेल असे त्यांनी म्हटले.

 Ajit Pawar-Sharad Pawar Alliance :
Maharashtra Politics: भाजप-ठाकरे गटाची युती होणार? भाजपची शिवसेनेला नवी 'ऑफर', नेत्यांच्या गुप्त भेटी सुरू

पुढे ते म्हणाले,"एकत्र येण्याची प्रक्रिया चालली आहे की नाही मला माहीत नाही. मात्र निवडणुकीत आघाडी व्हावी, युती व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलताना, आमदार निकम म्हणाले, गेल्यावेळी नगरपालिका निवडणुकांमध्ये चित्र वेगळं होतं. आम्ही महायुतीमधून लढण्याची भूमिका घेतली होती. काही कारणांमुळे ते घडू शकल नाही. यावेळी चिपळूणमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

 Ajit Pawar-Sharad Pawar Alliance :
राजकीय भूकंप होणार? पुढील ८ दिवसांत उलटफेर होणार, महापौरपदाच्या वादादरम्यान बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

पुढे बोलताना ते म्हणाले, तीन पक्षांची तिकीट वाटपाचा घोळ होतो आणि तो शेवटपर्यंत राहतो. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की,या निवडणुका 8 वर्षांनी होत आहेत. त्यामुळे चिपळूणमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 च्या 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती स्वतंत्रपणे लढवण्याची आम्ही भूमिका घेतली असल्याचं शेखर निकम यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com