Maharashtra Politics: भाजप-ठाकरे गटाची युती होणार? भाजपची शिवसेनेला नवी 'ऑफर', नेत्यांच्या गुप्त भेटी सुरू

BJP Offers Alliance to Thackeray Group In Akola : राज्यात वैर असलेले भाजप आणि ठाकरे गट अकोल्यात युती करणार असल्याची चर्चा आहे. अकोला महापालिकेतील सत्तेसाठी भाजपकडून ठाकरे गटाला मोठी ऑफर देण्यात आलीय.
BJP Offers Alliance to Thackeray Group In Akola :
Political leaders engage in behind-the-scenes talks as BJP explores alliance with Thackeray Sena in Akola mayor race.Saam tv
Published On
Summary
  • अकोला महापालिकेत सत्तेसाठी रस्सीखेच

  • भाजपकडे सर्वाधिक ३८ जागा, बहुमतासाठी ३ कमी

  • बहुमतासाठी भाजपची ठाकरे गटाशी थेट चर्चा

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

महापालिकांच्या निकालानंतर महापौरपदावरून पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालीय. मुंबईसह अनेक महापालिकांना महापौर पदासाठी राजकीय डाव आखलं जात आहेत. महापालिकेतील सत्तेसाठी ज्या विरुद्धात लढले त्यांच्यासोबत युती करण्याचा आघोरी प्रयत्न आता पक्षांकडून केला जात आहे. अकोल्यातही तसाच प्रकार होतोय. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचा पेच निर्माण झालाय.

BJP Offers Alliance to Thackeray Group In Akola :
Maharashtra Politics: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार, 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण

८० जागांच्या सभागृहात बहुमतासाठी ४१चा आकडा गाठणे आवश्यक आहे. दुसरीकडे भाजपने सर्वाधिक ३८ जागा जिंकल्या आहेत. तर २१ जागांसह काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. यामुळे दोन्ही आघाड्यांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान भाजपला बहुमतासाठी केवळ ३ जागांची गरज आहे. बहुमताच्या ४१ आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपची थेट ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर' दिलीय.

भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची गळ.घातली जात आहे. यासाठी भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची काल अकोल्यात एका गुप्त ठिकाणी भेटही झालीय. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपकडे उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला महापालिकेत 6 नगरसेवक आहेत. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजप चर्चा करणार आहे. भाजपच्या ऑफरवर शिवसेनेनी सावध भूमिका अकोला महापालिकेत ३८ जागा जिंकणारा भाजप आणि २१ जागा जिंकणारी काँग्रेस सत्तेसाठी सर्वच पर्यांयावर विचार करत आहे.

BJP Offers Alliance to Thackeray Group In Akola :
Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

अकोला महापालिकेतील बलाबल

एकूण जागा : ८०

बहुमताचा आकडा : ४१

भाजप : ३८

काँग्रेस : २१

उबाठा : ०६

शिंदे सेना : ०१

अजित राष्ट्रवादी : ०१

शरद राष्ट्रवादी : ०३

वंचित : ०५

एमआयएम : ०३

अपक्ष : ०२

काँग्रेसचा 'प्लॅन बी' : महाविकास आघाडी आणि अनपेक्षित साथ

दुसरीकडे काँग्रेसनेही हार मानलेली नाहीये. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर लहान पक्षांना एकत्र करून सत्ता खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे २१, ठाकरे गटाचे ६, शरद पवार गटाचे ३, वंचितचे ५ आणि एमआयएमचे ३ नगरसेवक एकत्र आल्यास हा आकडा ३८ होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com