उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण-डोंबिवलीतील बडा नेता भाजपमध्ये जाणार, राजकीय वर्तुळात खळबळ

kalyan Dombivli news : केडीएमसी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
maharashtra political news
kalyan Dombivli newsSaam tv
Published On
Summary

कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का

जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटाला रामराम

स्थानिक राजकारणात मोठा भूकंप

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकत लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या हालचालीमुळे स्थानिक राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा सुरु आहे.

डोंबिवलीत उद्या रविवारी त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. म्हात्रे यांच्या प्रवेशामुळे भाजपला कल्याण-डोंबिवली परिसरात संघटनात्मक बळ मिळणार आहे. तर ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा राजकीय फेरबदल ठाकरे गटासाठी धक्का ठरणार आहे. यातून पक्षातील अंतर्गत नाराजीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. केडीएमसी निवडणुकीच्या तयारीत असलेल्या दोन्ही गटांमध्ये या घडामोडीनंतर रणनीतीत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश हा केवळ व्यक्तीगत निर्णय आहे. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीतील गठबंधन समीकरणांवर परिणाम करणारा टप्पा ठरू शकतो.

maharashtra political news
Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

कोण आहेत दीपेश म्हात्रे?

ठाकरे गटाने दीपेश म्हात्रे यांना कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कळवा-मुंब्रा विधासभा क्षेत्र जिल्हाप्रमुखपदाची जबाबादारी सोपवली होती. दीपेश म्हात्रे हे कल्याण-डोंबिवलीतील जुने नगरसेवक म्हणून ओळखले जातात. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 2009 पासून नगरसेवक आहेत. त्यांनी पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारी 2 वेळा सांभाळली आहे.

maharashtra political news
१८० किमी वेगाने धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन; लोको पायलटच्या केबिनमधून सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

त्यांच्या कुटुंबाचाही पालिका क्षेत्रातील राजकारणात दबदबा आहे. त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांनी महापौरपद भूषवलं होतं. तर त्यांच्या कुटुंबात आई आणि बंधू देखील नगरसेवक होते. त्यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी खूप मोठा धक्का आहे. दीपेश म्हात्रे हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती. परंतु ते आता भाजपमध्ये प्रवेश करणाार आहेत. त्यामुळे हा शिंदेंच्या शिवसेनेसाठीही धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com