Shivajirao Adhalarao Patil On Amol Kolhe Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अमोल कोल्हेंवर टीका, अजित पवारांचे कौतुक, शिवसंकल्प यात्रेत आढळराव पाटलांची फटकेबाजी; म्हणाले...

Shivajirao Adhalarao Patil On Amol Kolhe: सगळ्यांनी शिरुर लोकसभेसाठी क्लेम केलेला आहे. हा मतदार संध महत्वाचा आहे. मात्र खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही.

रोहिदास गाडगे

Shirur News:

आगामी लोकसभा निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प यात्रा सुरू केली आहे. आज (शनिवार, ६ जानेवारी) शिरुरमधून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमात बोलताना शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले आढळराव पाटील?

"राज्यभरातील २२ मतदारसंघांमध्ये ही शिवसंकल्प सभा होणार आहे. ⁠शिरुर लोकसभा मतदार संघाचा विकास करायचा. हे माझे मिशन आहे.. असे आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) म्हणाले. तसेच निवडणुका जवळ आल्याने काहींना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे," असा टोलाही त्यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.

"संभाजी महाराजांच्या वढु - तुळापुर येथील स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी ४०० कोटी मंजुर केले. ⁠पुणे - नाशिक रेल्वेसाठी मी २० वर्षे प्रयत्न करतोय. पण दुर्देवाने मागील २-३ वर्षात प्रगती नाही. अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. तुम्ही ही घाला.. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच मागील पाच वर्षात नॅशनल हायवेचा एक ही रुपया आलेला नाही," असा टोला खासदार अमोल कोल्हे यांना लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदारकीसाठी आक्रोश करणार नाही..

यावेळी बोलताना आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) ना न घेता टीका केली. "सगळ्यांनी शिरुर लोकसभेसाठी क्लेम केलेला आहे. हा मतदार संध महत्वाचा आहे. मात्र खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही. तुमचा शब्द अंतिम असेल. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्ही मान्य करु..." असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cleaning Hacks : पाणी तापवण्याचा हिटर साफ करण्याची ही भन्नाट टेकनिक करा फॉलो; कमी होईल वीजबिल आणि पाणी होईल पटकन गरम

Bigg Boss 19 : गौरव की शाहबाज नवा कॅप्टन कोण? 'या' सदस्याच्या चुकीमुळे संपूर्ण घर नॉमिनेट

Maharashtra Live News Update: नाशिक पुणे महामार्गावर वाहतुक कोंडी...

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Train Bomb Threat : मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब, त्या मेसेजनंतर एकच खळबळ, पण...

SCROLL FOR NEXT