Loksabha Election 2024 : अजित पवार गटाचा भाजपच्या जागांवर दावा?, विदर्भातील राजकीय गणित कसे असेल?

Ajit Pawar Claim on BJP Seats : अजित पवार गटाने आता विदर्भातील १० पैकी ३ जागांवर आपला दावा केला. विशेष म्हणजे गोंदिया भंडारा, गडचिरोली, वर्धा या तिन्ही जागेवर सध्या भाजपचे खासदार आहे.
Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News Latest
Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News LatestSAAM TV
Published On

पराग ढोबळे

Political News :

लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप हा सर्वच पक्षांसमोरचा कळीचा मुद्दा असणार आहे. कारण महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. महायुतीकडून आमचं जागावाटपाचं ठरलंय, असं सांगितलं जात आहे. मात्र महायुतीतही तिन्ही पक्ष विविध मतदारसंघांवर आपला दावा सांगत असल्यां दिसल्याचं दिसून येत आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार गटाने आता विदर्भातील १० पैकी ३ जागांवर आपला दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे गोंदिया भंडारा, गडचिरोली, वर्धा या तिन्ही जागेवर सध्या भाजपचे खासदार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर सर्व खासदाराचं टेन्शन वाढलं आहे. (latest political news)

Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News Latest
CM Eknath Shinde News: अनेक वर्षांची घाण आम्ही स्वच्छ करतोय, उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर CM एकनाथ शिंदेंचा निशाणा

भाजपचे विद्यामान खासदार असलेल्या अशोक नेते यांचा जागेवर अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा अत्राम हे स्वतः इच्छुक असल्याचे सांगत आहेत. त्याच बरोबर भंडारा गोंदिया या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहे. या जागेवर देखील अजित पवार गटाने दावा केला असून येथे प्रफुल पटेल यांच्यासाठी जागा मागण्याची तयारी सुरु आहे.

Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News Latest
Breaking News: शरद पवार, अजितदादा आज एकाच मंचावर येणार? पिंपरी चिंडवडमध्ये नाट्यमय घडामोडी घडणार!

वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आहेत. या ठिकाणी सुद्धा अजित पवार गटाकडून मागणी केली जात आहे. येथे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते हे स्वत: तयारी करत असून वर्धा लोकसभा मतदारसंघातील अनेक लोकांच्या ते संपर्कात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com