Madrasa Removed In Pawangad: पावनगडावरील मदरसा पाडकामास सुरुवात; कोल्हापूरमध्ये संचारबंदीचे आदेश लागू

kolhapur Curfew News: मदरसा पाडणार असल्याने येथील ४५ विद्यार्थ्यांना काल रात्री शिरोलीमधील मदरसामध्ये हलवलंय. हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पाडकामाच्या कारवाईला सुरूवात केलीये.
Madrassas Removed In Pawangad
Madrassas Removed In PawangadSaam TV
Published On

kolhapur News:

कोल्हापुरमधील पावनगड परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पावनगडावरील मदरसा पाडकामाच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू करण्यात आलीये. आज रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.पाडकाम पूर्ण होईपर्यंत माध्यमांना देखील जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Madrassas Removed In Pawangad
Satej Patil Kolhapur News : कोल्हापुरात मविआचा उमेदवार कोण? सतेज पाटलांचं मोठं विधान

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावन गडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रियेला सुरुवात झालीये. बिहार आणि पश्चिम बंगालमधील 45 विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते. अरबिया जिणातुल कुराण असं बेकायदेशीर मदरसाचं नाव आहे. पावनगडावर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

मदरसा पाडणार असल्याने येथील ४५ विद्यार्थ्यांना काल रात्री शिरोलीमधील मदरसामध्ये हलवलंय. हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पाडकामाच्या कारवाईला सुरूवात केलीये. काल रात्रीपासून प्रशासन कारवाईसाठी पावनगडावर दाखल आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर मदरसा उभा राहिला असल्याच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

Madrassas Removed In Pawangad
Crime News: खळबळजनक! कबूतर सोडून दिल्याने मोठ्या भावाला राग अनावर; ७ वर्षीय भावाची हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com