मयुर राणे, ता. ८ सप्टेंबर २०२४
Sanjay Raut On Amit Shah Maharashtra Visit: मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरु आहे. गणेश भक्तांसह सिने जगतातील कलाकार, राजकीय नेतेमंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत असून ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"गृहमंत्री म्हणून मुंबईत पुन्हा येण्यासाठी परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचे दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील व्यापार गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे अमित शहा यांच्याबाबतीत महाराष्ट्रातील भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री आहेत. ह्या महाराष्ट्राचे कायदा व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, या गृहमंत्र्याच्या देशाच्या कायदा सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही राजकारण पक्षफोडी याला पाठिंबा देतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचे शत्रू मानते, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच "ज्याप्रमाणे अनेक उद्योग त्यांनी पळवले अनेक संस्था पळवल्या, त्याप्रमाणे एक दिवशी लालबागचा राजा देखील गुजरातला नेणार नाहीत ना? अशी मला भिती वाटते. महाराष्ट्र लुटायचा आहे, तोडायचा आहे, महाराष्ट्राची प्रगती, स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खूपत आहे, लालबागच्या राजाची एवढी किर्ती आहे, लाखो लोक येतात, चला गुजरातला घेऊन जाऊ, असे ते म्हणतील," असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, शरद पवार यांच्या डोक्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या विधानाचाही राऊतांनी समाचार घेतला. "देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे कळलं असतं तर अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला १०० जन्म लागतील. २०१९ मध्येही शरद पवारांनी डाव टाकल्यानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे म्हणत हिंमत असेल तर विधानसभा वेळेत घ्या," असे आव्हानही राऊतांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.