Sachin Ahir Saam Tv
मुंबई/पुणे

Sachin Ahir: मोठी बातमी! सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती, एकमताने झाली बिनविरोध निवड

Sachin Ahir New Deputy Chairman MLC: सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती झालेत. या निवडणुकीत सर्वांनी एकमताने त्यांची बिनविरोध निवड केली.

Priya More
  • सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली

  • शिंदेसेनेत प्रवेशानंतर त्यांना मोठी राजकीय संधी मिळाली

  • विरोधकांनी ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी मागे घेतली

  • निवडीनंतर सचिन अहिर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

गणेश कवडे, मुंबई

उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या सचिन अहिर यांना लॉटरी लागली. सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापती निवड झाली आहे. सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदी एकमताने बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती होताच सचिन अहिर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सचिन अहिर यांचे कौतुक केले.

सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापती पदी प्रस्ताव निवड प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी ज. मो अभ्यंकर यांच्या उपसभापती पदासाठी प्रस्ताव मांडला होता. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अंबादास दानवे यांनी मांडलेल्या.ज. मो अभ्यंकर यांच्या नावाच्या प्रस्तावासमोर सचिन अहिर यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.

सचिन अहिर यांची उपसभापती पदी निवड करण्यासाठी महायुतीमधून तीन प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षातर्फे प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संजय खोडके यांनी हा प्रस्ताव मांडला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे मनीषा कायंदे यांनी प्रस्ताव मांडला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे ज. मो अभ्यंकर यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली म्हणून प्रस्ताव मांडला होता.

उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे असा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्यामुळे अभ्यंकर यांचा अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली विनंती मान्य करत ज. मो अभ्यंकर यांचा उमेदवारी प्रस्ताव मागे घेतला. अनिल परब यांनी सभागृहाची गरीमा राखण्यासाठी ज. मो अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घेण्यात आला असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे सचिन अहिर हे बिनविरोध एकमताने विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवडून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन-चांदी खरेदीची सुवर्णसंधी, सोनं २००० तर चांदी २५०० रुपयांनी स्वस्त; वाचा लेटेस्ट दर...

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात शेतकरी दिनाच्या दिवशीचं शेतकऱ्यांचा प्रशासना विरोधात रोष

Mumbai rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा धुमाकूळ; रस्ते पाण्याखाली- नागरिकांचे हाल, पुढचे २ दिवस सतर्कतेचे

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, रेल्वे उशिराने; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Famous Actress : २ दिवस सहन केलं, तिसऱ्या दिवशी दगड उचलला अन् डोकं फोडलं; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला छेडछाडीचा थरारक अनुभव

SCROLL FOR NEXT