Navin Lade, Ramdas Athawale And Uddhav Thackeray Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मुंबईत रिपाईला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली आठवलेंची साथ; ठाकरे गटाची ताकद वाढणार

RPI Leader Navin Lade Resign: रिपाईचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंनी राजीनामा दिला. लवकरच ते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. ऐन निवडणुकीदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रिपाईचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंनी राजीनामा दिला. लवकरच ते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत रिपाईचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे निवडणुक काळात याचा रिपाईसोबत महायुतीला मोठा फटका बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन लादे यांनी रिपाईची साथ सोडली आहे. रिपाईचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंनी राजीनामा दिला. नवीन लादे यांनी रोजगार आघाडी, माथाडी आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र सचिवपदाचा आणि प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला. सत्तेत असताना कार्यकर्त्यांना सत्ता पदे मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे नवीन लादे यांनी रिपाईमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

नवीन लादे यांचा राजीनामा रिपाई पक्षासाठी मोठा धक्का आहे. लादे यांनी आरपीआय पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा रामदास आठवले यांना ई-मेलवर पाठवला. नवीन लादे आपल्या ४०० हून अधिक समर्थकांसह येत्या दोन दिवसांत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार आहे. नवीन लादे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठं बळ मिळणार आहे.

दरम्यान, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही रिपाई आठवले गटाने उमेदवार उभे केले नाहीत. त्यात महायुतीतील घटक पक्षाकडून रिपाई कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही, अशी खंत रिपाईचे नेते, पदाधिकरी आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिपाईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ऐन निवडणुकीत आठवले यांना एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT