Kej Vidhan Sabha : बीडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी; मुंदडांच्या उमेदवारीवरून रिपाई आक्रमक, बैठक घेत मतदान न करण्याचा ठराव

Beed News : विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही जागांवर मित्र पक्षांमधूनच नाराजीनाट्य सुरु झाले आहे. यातून पक्षातील पदाधिकारी राजीनामे देखील देत आहेत.
Kej Vidhan Sabha
Kej Vidhan SabhaSaam tv
Published On

बीड : बीडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. बीडच्या राखीव असणाऱ्या केज मतदारसंघातून भाजपने नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र मुंदडा यांची उमेदवारी मागे घेऊन रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांना उमेदवारी द्यावी; असं म्हणत बीड जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आक्रमक झाली आहे. इतकेच नाही तर केजमध्ये रिपाई पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठक घेवून कमळ अन् महायुतीला मतदान करायचं नाही असा ठराव केला आहे. 

विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही जागांवर मित्र पक्षांमधूनच नाराजीनाट्य सुरु झाले आहे. यातून पक्षातील पदाधिकारी राजीनामे देखील देत आहेत. दरम्यान (Beed) बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात देखील जागा वाटपावरून महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात (BJP) भाजपकडून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आल्याने रिपाई आक्रमक झाली आहे. 

Kej Vidhan Sabha
Malkapur Vidhan Sabha : मलकापूर विधानसभेत सेवानिवृत्त अधिकारी रिंगणात; भाजप व काँग्रेससमोर आव्हान

केजमध्ये रिपाईचे आज बैठक घेत भाजप व महायुतीला मतदान न करण्याचा ठराव केला. तसेच आमचे मतदान पाहिजे, मात्र आमचा उमेदवार नको. ही खेळी चालणार नाही. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जर पप्पू कागदेंना उमेदवारी दिली नाही, तर कमळ फुलू देणार नाही; असा थेट इशाराच रिपाई कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसेच अनुसूचित जातीच्या राखीव मतदार संघावर मारवाडी कुटुंबालाच उमेदवारी दिली. त्यामुले याची किंमत मोजावी लागेल, असा देखील इशारा बैठकीनंतर रिपाई कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com