Raj-Uddhav Thackeray saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दसऱ्याला नव्या युतीची घोषणा? राज -उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, तातडीची बैठक बोलावली

Raj-Uddhav Thackeray: द्धव ठाकरे यांनी बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थवर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

Priya More

Summary -

  • उद्धव आणि राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी तातडीच्या बैठका बोलावल्या.

  • दसऱ्याच्या सुमारास नव्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

  • शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुंबईत आज मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकींवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीवर मनसेच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील महत्वाची बैठक बोलावली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वांना येण्यास सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान आगामी महानगर पालिका निवडणुकांबाबत रणनिती ठरली आहे. त्यानंतर आता दोन्ही नेते आपल्या पक्षाच्या जिल्हाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. बुधवारी अडीच तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तब्बल अडीच तास दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली. गणेशोत्सवानंतर ठाकरे बंधूंची ही दुसरी भेट होती. संजय राऊत आणि अनिल परब देखील या भेटीवेळी उपस्थित होते. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात आले होते. तर ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे काय रणनिती ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट

Maharashtra Live News Update: लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव सुरू

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT