
राज ठाकरे आता महाविकास आघाडीत येणार .. अशा चर्चांनी आता जोर धरलाय... याला कारण ठरलयं. महाविकास आघाडीतील नेत्यांची मातोश्रीवर झालेली खलबत.. 8 सप्टेंबरला विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल या काँग्रेसी नेत्यांनी मातोश्री गाठली आणि याचं भेटीत राज ठाकरेंना मविआत घ्यावं का? यावर थेट चर्चा झाली..मात्र या चर्चेत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहूयात...
मनसेला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करायचे झाल्यास इतर दोन्ही घटक पक्षांशी चर्चा करावी लागणार. उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत परस्पर युती करायची झाल्यास त्यांची महविकास आघाडीमधील नेमकी भूमिका काय आहे, याचीही स्पष्टता आणावी लागणार असल्याची चर्चा झालीय.
दरम्यान मातोश्रीवरील भेटीनंतर विजय व़डेट्टीवारांनीही हायकमांडशी बोलून मनसेबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलयं. तर दुसरीकडे युतीचा निर्णय फक्त राज ठाकरेंचं घेतली, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडेंनी लगावलाय.
मनसेसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक असले तरी याआधी काँग्रेस नेते रमेश चेन्निथलांनी मनसेसोबतच्या आघाडीला उघडपणे विरोध केला होता... त्यामुळे काँग्रेसकडून आताही सावध पवित्रा घेतला जातोय...यामागे नेमकी काय कारणं आहे पाहूयात...
राज ठाकरेंच्या मविआतील सहभागाने उत्तर भारतीय दुरावण्याची काँग्रेसला भीती आहे. तसचं मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी भुमिकेमुळे मुस्लीम मतदार फारकत घेतील, याचीही शक्यता वर्तवली जातेय. त्याचबरोबर मविआतील मनसेच्या सहभागाने जागा वाटपावर परिणाम होणार असल्यानं काँग्रेसनं अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
मात्र ठाकरे बंधूंमध्ये झालेल्या मनोमिलनामुळे राज ठाकरे आता मविआत येण्याचा निर्णय घेतात का? की उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडून ठाकरे ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी राज ठाकरेंसोबत नव्या प्रादेशिक आघाडीची घोषणा करणार, यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.