उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला की शिवसेना कधीही फुटणार नाही.
पक्षाची तटबंदी मजबूत असल्याने कोणतेही धक्के शिवसेनेला फोडू शकणार नाहीत.
शाखा प्रमुखांना मतदार यादी तपासून घरोघरी भेट देण्याचे निर्देश दिले.
येत्या आठवड्यात विघ्नहर्त्याच्या आगमनाची तयारी आणि मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर लक्ष ठेवण्याची सूचना.
मुंबई येथील एका शाखेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन सर्व शाखाप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संवादात सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये बातम्या झळकत आहेत की इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे शिवसेनेला धक्का. एकदा जाऊन बघू की किती धक्के बसले आहेत. असे धक्के देणारे अनेकजण आले आणि गेले, कदाचित धक्के बसले असतील, पण धोका झालेला नाही. जो पर्यंत तटबंदी मजबूत आहे, तोपर्यंत ही धक्के आणि धोके देणाऱ्यांचे डोके फुटतील; शिवसेना कधीच फुटणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, येत्या आठवड्यात विघ्नहर्त्याचे आगमन होत आहे. मी त्याच्याजवळ प्रार्थना करतोय की, तुझ्या कार्याचा हिंदुत्वाचा भगवा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. भगवा घेऊन रस्त्यात काही काळी काळ्या, अपशकुणी मांजर येतील, त्या काळ्या मांजरांचा बंदोबस्त तूच कर. नाहीतर तुझे शिवसैनिक आहोतच, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, असेही त्यांनी नमूद केले.
त्याचबरोबर, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आणि सांगितले की, येथील सर्व मतदार यादी तपासा, घरोघरी जाऊन पाहा की एका माणसाला एकच मत आहे की नाही, असे सूचनाही त्यांनी दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.