आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षातील सध्या विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याचे चित्र समोर येत आहेत. याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये ही परिस्थिती दिसून येत आहे. विधानसभेसाठी उमेदवारांकडून होणारी बंडखोरी थांबवण्याचे भाजप समोर मोठं आव्हान आहे. पुण्यात भाजप आमदारांच्या विरोधातच पक्षातील इच्छुक निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत.
पुण्यामध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट विधानसभेसाठी विद्यमान आमदारांच्या विरोधातच दंड थोपटले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर काम केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आकांक्षा उंचावल्या आहेत. पुण्यातील ८ विधानसभा मतदार संघापैकी एखादा मतदार संघ वगळता इतर सर्वच मतदारसंघात विधानसभेसाठी एकापेक्षा जास्त अधिक इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.
पुण्यातील कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला आणि वडगावशेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. कसबा विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी शहराध्यक्षांसह माजी आमदारांच्या घरातील सदस्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यामध्ये सध्याचे विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर त्यांच्याच मतदारसंघामध्ये भाजपचे नेते आणि नगरसेवक यांना देखील निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. भाजपने पुणे शहरातील ६ मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी निरीक्षकांच्या उपस्थितीत त्या-त्या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. या ६ ही जागांपैकी ५ जागांवर विद्यमान आमदारांनाच पसंती मिळाल्याने अन्य इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कसबा मतदारसंघ - रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
इच्छुक - हेमंत रासने, धीरज घाटे, कुणाल टिळक
कोथरूड मतदारसंघ - चंद्रकांत पाटील (भाजप)
इच्छुक - अमोल बालवडकर, उज्वल केसकर, श्याम देशपांडे
पर्वती मतदारसंघ - माधुरी मिसाळ (भाजप)
इच्छुक - श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर
खडकवासला मतदारसंघ - भीमराव तापकीर (भाजप)
इच्छुक- प्रसन्न जगताप, दिलीप वेडे पाटील, हरिदास चरवड
शिवाजीनगर मतदारसंघ - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
इच्छुक - सनी निम्हण, मधुकर मुसळे, दत्ता खाडे
कॅन्टोन्मेंट मतदारसंघ - सुनील कांबळे (भाजप)
इच्छुक- दिलीप कांबळे
वडगाव शेरी मतदारसंघ - सुनील टिंगरे (राष्ट्रवादी अजित पवार)
इच्छुक - जगदीश मुळीक
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.