भारतीय जनता पार्टी पुणे यांच्या वतीने शहरातील सहा मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी निरीक्षकांच्या उपस्थितीत त्या-त्या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. या सहाही जागांपैकी ५ जागांवर विद्यमान आमदारांनाच पसंती मिळाल्याने अन्य इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संताप करणारे देखील भाजपचेच नगरसेवक आहेत. सर्वाधिक पसंती चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर यांनाही सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर यांच्याविरोधात पक्षातील नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी निरीक्षकासमोर तक्रारी केल्या. मतदान प्रक्रिया पुन्हा घेण्यात यावी. आमदाराने सर्वांवर दबाव आणला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कोथरूड मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातही श्याम देशपांडे आणि अमोल बालवडकर आक्रमक झाले. कार्यकर्ता निडर असावा, चुकीचं काही होत असेल तर ते रोखठोक मांडणारा असावा. त्यामुळे माझे पक्षाबद्दल काही चुकीचे मत नाही. तर काही व्यक्तींबद्दल तक्रार आहे.
पर्वती मतदार संघात माधुरी मिसाळ यांच्याविरोधातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक लोकांना मतदानासाठी निरोप ही दिला नाही अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या . पर्वती मतदारसंघात श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजीचा फटका श्रीनाथ भिमाले यांच्यामुळे माधुरी मिसाळसहे सगळ्यांना बसणार आहे.
कसबा मतदारसंघातात भाजप कार्यकर्त्यांमध्येच पोस्टरवॉर रंगला आहे. हेमंत रासने यांनी तयार आहे म्हणत पुन्हा शड्डू ठोकला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी हेमंत रासने यांना पसंती दिली आहे.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये आमदार सुनील कांबळे ही कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या नाहीत.
शिवाजीनगर मतदारसंघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधातही इच्छुक आक्रमक झाले आहेत. मतदान प्रक्रिया पार पडली. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात मधुकर मुसळे आक्रमक झाले असून शिवाजीनगर आमदाराला कंटाळून भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
पाच ही मतदारसंघात भाजपा आमदारांना त्यांच्यात पक्षातील बंडाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आमदार कशापद्धतीने कार्यकर्त्यांची समजूत काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळी पुण्यामध्ये या पाचही मतदारसंघामध्ये पक्षाकडून नेमकी कोणाला संधी देण्यात येणार आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण सध्या या मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.