Parth Pawar Meets Sharad Pawar at Silver Oak  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग, पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट; २ तासांच्या भेटीत काय चर्चा झाली?

Parth Pawar Meets Sharad Pawar at Silver Oak: शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज पार्थ पवार यांनी आज त्यांची भेट घेतली. दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली.

Priya More

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड घडेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. शरद पवार रुग्णालयात असताना त्यांच्या भेटीसाठी आणि प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेते रुग्णालयात आले होते. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांनी १० तारखेनंतर आपण बोलू असे प्रफुल्ल पटेल यांना सांगितले होते.

प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील विलिनीकरणाबाबत मोठं विधान केले होते. शरद पवार यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या सर्व घडामोडींनंतर आज दिवाळीच्या दिवशी पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्या. त्यामुळे आता विलिनीकरणाच्या चर्चांनी वेग धरला आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मोठं विधान केले होते. त्यांनी सांगितले की, 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची सध्या तरी कुठलीच चर्चा नाही. पण अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसले असते. अजित पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा मागे पडली. अजित पवार असते तर जी १२ फेब्रुवारी ही तारीख जी सांगितली जात आहे ती निश्चित झाली असती. तेव्हाच राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये सोलर प्लांटला भीषण आग! सोलर प्लेट्स जळून खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

लक्ष्मीपूजनासाठी खास लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी, 5 सोप्या आणि सुंदर डिझाईन्स

Married Life Tips : पती-पत्नीमध्ये किती वयाचे अंतर असावे? यशस्वी आणि सुखी संसाराचं गणित समजून घ्या

Diabetes and Sweets: साखरेऐवजी गूळ वापरून मिठाई खाताय? थांबा! मधुमेही रुग्णांसाठी हा पर्यायही ठरू शकतो धोकादायक

Soft Glam Makeup: सणासुदी ते लग्नसराईपर्यंत ट्राय करा सॉफ्ट ग्लॅम मेकअप; दिसाल सगळ्यात सुंदर आणि आकर्षक!

SCROLL FOR NEXT