Sachin Ahir joins Eknath Shinde-led Shiv Sena and files nomination for Deputy Speaker post in Maharashtra Assembly. saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राज्यात ऑपरेशन टायगर 3 सुरू; ठाकरेंचे सचिन आहिर फुटल्यानंतर शिंदेंची तुफान टोलेबाजी

Sachin Ahir Joins Shinde Sena Latest News: उद्धव ठाकरे गटातील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत उपसभापती पदासाठी अर्ज भरला आहे. या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे यांचे शिलेदार आमदार सचिन आहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज भरला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, आज सचिन आहिर यांनी षटकार मारला आहे. सहा खासदारांनी षटकार ठोकले. आता सहा मतदारसंघात काही जाऊन आले. त्यांचे सचिन आहिर यांनी षटकार मारून स्वागत केले. चौकार, षटकार सुरुच आहे आणि राहतील. एकेक विकेट पडत राहील. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. सचिन आहिर हे तीन वेळा विधानसभेचे आमदार होते. आता विधानपरिषदेचे आहेत, राज्यमंत्री होते, सात विभागांचं राज्यमंत्रिपद होते. गिरणी कामगारांचे नेते म्हणून काम केले. अनेक युनियनमध्ये त्यांनी प्रमुख पदांवर काम केले. कोळीवाड्यांचा मूळ मुंबईकर, भूमिपुत्रांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ओळख आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला, कामगारांना, कोळीबांधवांना शिवसैनिकांना न्याय देणार नेता म्हणून सचिन आहिर यांची ओळख आहे.

खऱ्या अर्थाने त्यांनी आज विधान परिषद उपसभापतिपदाचा अर्ज भरला आहे. महायुतीकडून फॉर्म भरला आहे. महायुती आज मजबुतीने दोन्ही सभागृहात बहुमतात आहे. त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्याच त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. ते फक्त मुंबईपुरते नाही, तर महाराष्ट्रात उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील. ते आल्याने शिवसेनेची देखील ताकद मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात, कामगार क्षेत्रात असेल किंवा त्यांनी केलेल्या कामाचे विभाग आहेत तिथे ताकद वाढेल.

पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, ताकद वाढण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षात त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. एक टीम म्हणून काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देतो. गेल्या काही काळात बघितलं तर २०२२ ला देखील ज्या वेळेस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उठाव झाला. आज ३० जूनला बरोबरच आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला होता. परंतु अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कारकीर्दीत जे काम केले, दोघांनी टीम म्हणून काम केलं. राज्यात अनेक वर्षांपासूनचे प्रकल्प प्रलंबित होते, त्याला चालना दिली. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर १ वर आणला असेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विकासाचा वेग बघितला तर गेल्या चार पाच वर्षांत ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास होतो. डबल इंजिनचं सरकार काम करतंय. केंद्रातून पंतप्रधान मोदी आम्हाला पाठिंबा देतात, सहकार्य करतात. मोदींच्या सरकारने गेल्या १० वर्षांत भरभरून निधी दिला. मोठी गुंतवणूक येत आहे. लोकप्रतिनिधींना सर्वांत महत्त्वाचे काय हवे असते, तर विकास. त्यांच्या मतदारसंघातील जनतेला न्याय मिळावा, ही त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच ते आमच्यासोबत येत आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra News Live Update: कर्णकर्कश डीजेविरोधात पुण्यात आणखी एका आंदोलनाचे आयोजन

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

Vegetable juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या या 4 भाज्यांचे ज्यूस, पोटावरची चरही मेणासारखी वितळेल

Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

SCROLL FOR NEXT