Nilesh Lanke Meet Gaja Marane Saam Tv
मुंबई/पुणे

Nilesh Lanke: ब्रेकिंग! खासदार निलेश लंके यांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; VIDEO समोर येताच सत्ताधारी आक्रमक

Rohini Gudaghe

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली आहे. निलेश लंके हे सध्या पुणे दौरा करत आहे. या दौऱ्यादरम्यानच त्यांनी गजा मारणेची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, निलेश लंके गजा मारणेला का भेटले? या भेटीमागचं कारण काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

आता या भेटीमुळे निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे दौऱ्यावर निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेला भेटले आहेत. त्यांनी गजा मारणेकडून सत्कार देखील स्विकारला (Maharashtra Politics) आहे. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. निलेश लंके आणि गजा मारणेच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निलेश लंकेंचा पुणे दौरा

गजा मारणे याच्यावर पुणे आणि परिसरातून विविध गुन्हे दाखल आहेत. खंडणी, खुनाचा प्रयत्न, मोक्का आणि अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमध्ये गजा मारणे आरोपी आहे. तो अनेक वर्ष तुरूंगात देखील होता. त्यामुळे त्याच्यावर नेहमी टीका होत असते. नुकतंच पोलीस आयुक्तांनी गुंडांची झाडाझडती घेतली होती, त्यामध्ये गजा मारणेचा देखील समावेश होता, अशा एका गुंडाची भेट घेतल्यामुळे निलेश लंके चर्चेत (Nilesh Lanke) आले आहेत.

लोकसभेत निवडून आल्यानंतर निलेश लंके सध्या पुणे दौरा करत आहेत. या दरम्यान ते वेगवेगळ्या लोकांना भेटत आहे. अशातच त्यांनी गजा मारणेची ( Gaja Marane) भेट घेतली आहे. लोकसभेत निवडून आल्यानंतर निलेश लंकेंनी हा सत्कार स्विकारला आहे. या भेटीदरम्यान निलेश लंके गजा मारणेसोबत चर्चा करताना, गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. या भेटीमुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार अन् निलेश लंके चर्चेत आले आहेत.

अमोल मिटकरी आक्रमक

काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती, त्यावेळी तुतारी गट आक्रमक झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी चूक मान्य केली होती. आज मात्र निलेश लंकेंनी गजा मारणेच्या घरी जावून सत्कार (Nilesh Lanke Pune Visit) स्विकारला. आता यावर लंके काय स्पष्टीकरण देणार, असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.

याबाबत स्वत: निलेश लंकेंनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हाणामारी झाली, त्याचा संबंध गजा मारणेपर्यंत जातो का, याचा शोध घेतला पाहिजे. या भेटीबाबत लंकेंच्या स्पष्टीकरणाची वाट बघत असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT