MLA Sanjay Gaikwad  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

Sanjay Gaikwad News : आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या विधाननंतर आमदार गायकवाड यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Suprim Maskar

फिल्मी ,स्टाईल कँटिन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झालीय. कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गायकवाड यांच्याविरोधात तक्रार नसल्यानं कारवाई करु शकत नाही, असं विधान केलं.

गायकवाड यांनीही कदमांच्या विधानाची री ओढत.. मलाही कायदा कळतो, असं म्हणत आपल्या कृतीचं समर्थन केलं. दोन दिवस विरोधकांनी गायकवाड यांच्य़ाविरोधातील कारवाईसाठी रान उठवले.अखेर तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असं विधान केलं.

यानंतर पोलिस यंत्रणेला जाग आली आणि मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अदखलपात्र गुन्ह्यामुळे पोलिसांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय गायकवाड यांना अटक किंवा तपास करता येणार नाही. त्यामुळे गुंडगिरी करून नागरिकांना मारहाण करणाऱ्या अपवादात्मक राजकारण्यांप्रमाणे गायकवाडांवरचा गुन्हाही कुठल्याच कारवाईशिवाय नावापुरताच मर्यादीत राहणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT