Pimpari Chinchwad Latest News:  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसणार? तब्बल १४ नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट, पाहा VIDEO

Pimpari Chinchwad Latest News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 14 नगरसेवकांनी काल पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे, ता. ३० जून २०२४

लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उपथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट पाहता राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते शरद पवारांकडे परत येणार असल्याची चर्चा आहे. अशातच काल पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या १४ नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटामध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याची चर्चा आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 14 नगरसेवकांनी काल पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा नगरसेवक आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 36 माजी आजी-माजी नगरसेवक शरद पवार गटांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्याचबरोबर चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेही आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे विधानसभा तोंडावर असतानाच शरद पवार पुन्हा एकदा अजित दादांना धक्का देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT