Sanjay Raut on Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Sanjay Raut: कोण संजय राऊत? अजित पवारांचा पत्रकारांना खोचक सवाल; नेमकं काय घडलं?

Sanjay Raut Vs Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे..

Prachee kulkarni

Pune News: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाजप (BJP) प्रवेशाच्या बातम्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर स्वतः अजित पवार यांनी खुलासा केला होता. यावेळी त्यांनी मी राष्ट्रवादी सोडणार नाही, असे बॉन्डपेपरवर लिहून देऊ का, असा थेट सवाल केला होता. यामुद्द्यावरुन संजय राऊत यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. ज्याबद्दल अजित पवार यांना विचारले असता त्यांनी कोण संजय राऊत? असा खोचक सवाल विचारला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अजित पवार सध्या सध्या पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांनी यांनी आज पत्रकार परिषद घेवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की "राज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानी आहे. बँकेने मागील वर्षी ढोबळ नफा ३५१ कोटी ४१ लाख मिळाला आहे. यावेळी माझ्या बाबतीत शंका कुशंका डोक्यातून काढा," असे अजितदादा म्हणाले.

कोण संजय राऊत... ?

दरम्यान, "तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत (Sanjay Raut) हे सल्ले देत आहेत," असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार यांनी "कोण संजय राऊत ? मी कुणाचं नाव घेतलेले नाही. मी माझ्या पक्षाबद्दल बोललो होतो, त्यामुळे कोणी का म्हणून अंगाला लावून घ्यावे," असा सवाल अजितदादा यांनी केला.

अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे, अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक पुन्हा एकदा वाढणार की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

SCROLL FOR NEXT