सचिन जाधव, पुणे|ता. २९ डिसेंबर २०२३
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. आगामी लोकसभांच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून मतदार संघांवर दावे- प्रतिदावे केल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डॅशिंग नगरसेवक वसंत तात्या मोरे (Vasant More) हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अशातच आता मनसेचे पुणेशहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात न उतरलेल्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेने यावेळी तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मनसेकडून पुणे लोकसभेसाठी मनसेचे नेते डॅशिंग नगरसेवक वसंत तात्या मोरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अशातच साईनाथ बाबर यांनीही लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आदेश दिल्यास मी लोकसभा लढवणार असून पुण्याचा (Pune) पुढील खासदार हा मनसेचा असणार हे मात्र नक्की... असा विश्वास साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी व्यक्त केला आहे. आज राज ठाकरेंची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर केली चर्चा केल्याचेही साईनाथ बाबर यांनी सांगितले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २२ जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसेने लोकसभेसाठी कंबर कसली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) सातत्याने बैठका घेत आहेत. अशातच वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोन्ही नेत्यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे कोणाला आदेश देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.