MLA Rohit Pawar on Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजितदादांचं कुटुंब आता वेगळं, रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, "पवार साहेबांच्या कुटुंबात"

MLA Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवार यांनी पवार कुटुंबाबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. अजितदादा यांचं कुटुंब आता वेगळं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

Satish Daud

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबात मोठी दुफळी निर्माण झाल्याची चर्चा आहे. अजित पवार हे एकटे पडल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत, असं म्हटलं होतं. आज रोहित पवार यांनी पवार कुटुंबाबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. अजितदादा यांचं कुटुंब आता वेगळं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना मोठं विधान केलं. “अजित पवार यांचा दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी घरच्याच व्यक्तीला राज्यसभेची खासदारकी देण्याचा निर्णय घेतला असावा", असं रोहित पवार म्हणाले.

"त्यांच्या पक्षातील नेते कुठेतरी काहीतरी कुजबूज करत असतील. म्हणून त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहिला नसेल. कुणावरही विश्वास राहिला नसल्यामुळे राज्यसभा पद घरच्याच व्यक्तीला दिलं तर योग्य ठरू शकतं. पण आता अजित पवार यांचं कुटुंब वेगळं आहे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कुटुंब वेगळं आहे”, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.

घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवरही आमदार रोहित पवार यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. नरेंद्र मोदी एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात. दुसऱ्या बाजूने अनेक कुटुंबांना फोडून ते आपल्यासोबत घेतात. यामध्ये विखे पाटील कुटुंब, पवार कुटुंब, मुंडे कुटुंब असे अनेक कुटुंब आपल्याला दिसतील. सर्वात जास्त घराणेशाही आपल्याला भाजपमध्ये दिसेल, असंही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नाराज होऊन दरवाजा बंद करुन बसत नाही. मी कोणत्याही एका व्यक्तीवर टीका करत नाही. आम्ही लोकांची भूमिका बोलून दाखवली. अनेकांना पक्षांसोबत येण्याची इच्छा असते. पण माझ्याकडे कोणतही पद नसल्याने मला निर्णय घेता येत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील पक्षात चांगल काम करत आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी त्यांचं कौतुक केलं. पद असो किंवा नसो. मुद्दा महत्वाचा असेल तर त्यावर बोललं पाहिजे. आता नीट परीक्षेचा मुद्दा होता. त्यावर तातडीने बोलणं गरजेच होते. ते झालं नाही असं म्हणत रोहित पवार यांनी थोडीफार नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

शाहजहाँने दिल्लीमध्येच का बनवला लाल किल्ला?

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT