Pankaja Munde News: ओबीसी आंदोलनावरून पंकजा मुंडे आक्रमक, राज्य सरकारला दिला घरचा आहेर

Lakshman Hake Hunger Strike : पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून आक्रमक झाल्यात. आरक्षणावरी भुमिकेवरून त्यांनी राज्य सरकारला कडक शब्दांत घरचा आहेर दिला आहे.
pankaja munde reaction
Pankaja Munde NewsSaam Tv
Published On

गेल्या ५ दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अशात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून आक्रमक झाल्यात. आरक्षणावरी भुमिकेवरून त्यांनी राज्य सरकारला कडक शब्दांत घरचा आहेर दिला आहे.

समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. ओबीसी आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका मायबापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे." असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली

गेल्या पाच दिवसांपासून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. अशात लक्ष्मण हाके यांची प्रकृती आज खालावली आहे. तसेच त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून त्यांची भेट घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com