Kapil Patil Left JDU Saamtv
मुंबई/पुणे

Kapil Patil News: लोकसभेच्या तोंडावर नितीश कुमार यांना धक्का, राष्ट्रीय महासचिव कपिल पाटलांचा राजीनामा; नव्या पक्षाची घोषणा

Kapil Patil Left JDU: जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आणि विधान परिषद आमदार कपिल पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई|ता. ३ मार्च २०२४

Kapil Patil New Party Announcement:

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितिशकुमार यांना मोठा धक्का बसला आहे. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आणि विधान परिषद आमदार कपिल पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जनता दल युनायटेड या पक्षात कपिल पाटील यांच्याकडे महासचिव या पदाची जबाबदारी होती. परंतु जनता दल युनायटेड पक्ष हा भाजपसोबत गेल्याने कपिल पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात होते. नितीशकुमार यांची एनडीएसोबत जाण्याची भूमिका कपिल पाटील यांना पटली नसल्यामुळे त्यांनी पक्षाचे महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे.

आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत कपिल पाटील हे नवीन पक्षाची घोषणा करत आहेत. समाजवादी गणराज्य पार्टी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल. धारावीमध्ये होणाऱ्या संयुक्त समाजवादी संमेलनातून ते या नव्या पक्षाची घोषणा करतील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, आगामी काळात समाजवादी गणराज्य पार्टी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत राहणार आहे. अशातच समाजवादी गणराज्य पार्टी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत किमान ५-६ जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका, दोन्ही देशांकडून तुफान गोळीबार

Modi Cabinet Meeting : मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन टप्प्यात होणार जनगणना, 11 हजार 718 कोटींचा बजेट मंजूर

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Jahnavi Killekar Photoshoot: निळं आकाश अन् निळी बिकनी, जान्हवीचे बोल्ड फोटो पाहून थायलंडचं वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT