Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मराठा क्रांती मोर्चा पुण्यात उमेदवार देणार, मविआ आणि महायुतीचं टेन्शन वाढलं

Maratha Kranti Morcha: मराठा क्रांती मोर्चाने ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केला आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. मराठा क्रांती मोर्चा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चा ठाण्यातील चार विधानसभा जागांवर उमेदवार उतरवणार आहे. त्याचसोबत मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून मराठा समाजाचा उमेदवार देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी एक बैठक घेतली होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा देत एक मताने हा ठराव केला आहे.

नुकत्याच झालेल्या सकल मराठा आणि मराठ क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमताने ठराव करून मराठा उमेदवार देण्याची तयारी पुण्यातून सुरू आहे. नाराज दीपक मानकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आहेत. राष्ट्रपती नियुक्त आमदारकी न मिळाल्याने ते नाराज आहेत. अशात पुणे मराठा क्रांती मोर्चाने त्यांना मराठा उमेदवार म्हणून खडकवासला विधानसभेतून निवडणूक लढवण्याचा ठराव केला आहे. दीपक मानकर यांना प्रस्ताव देण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर आणि मराठा समाज याचा फटका अनेक सत्ताधारी उमेदवारांना बसला होता. विरोधकांना फायदा झाल्याचा दावाही यावेळी करण्यात आला होता. आता विधानसभेला मराठा समाजाच्या मतांना महत्व आले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाने आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT