Eknath Shinde with Ravindra Dhangekar  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Eknath Shinde with Ravindra Dhangekar: पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजिनामे दिले. त्यांनी रविंद्र धंगेकर यांच्याकडे राजीनामे दिले.

Priya More

Summary:

  • पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडली

  • शिवसेना शिंदे गटाला पुण्यात खिंडार पडलं

  • शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले

पुण्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पुण्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांकडे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. शिंदेसेनेला पुण्यात आठच जागा मिळत असल्याने पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यांनी आपले राजीनामे शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याकडे दिले आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नसल्याचा आरोप अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मोठी नाराजी आज बोलून दाखवली. पुढील काळामध्ये पक्षाला बळ द्यायचे असेल तर कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2029 मध्येही काँग्रेसचा चौथ्यांदा पराभव होणार; अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान

Maharashtra News Live Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला; हल्लखोर महिलेकडून चाकू जप्त

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT