Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार कधी? गृहमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा कायम

Mahayuti Government: महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावराचा तिढा अद्याप सुटलेला नसून शिवसेना आणि भाजपमध्ये दोन्ही पक्ष गृहमंत्रिपदावर ठाम आहे.

Priya More

सूरज मसूरकर, मुंबई

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महायुती विजयी झाली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर २८८ आमदारांनी देखील शपथ घेतली. पण अद्याप महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावराचा तिढा अद्याप सुटलेला नसून शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून नाराजी पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत अद्यापही अस्वस्थता कायम आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेकजण गॅसवर आहेत. मोठी खाती पदारात पाडून घेण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मुख्य म्हणजे गृहमंत्रिपदावर शिवसेनेचा आजही दावा कायम आहे. गृहमंत्रिपदासाठी शिवसेनेची कठोर भूमिका? तर दुसरीकडे भाजपही गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाही आहे.

विशेष अधिवेशन संपताच तीनही नेत्यांची मंत्रिमंडळ विस्तारावरुन बैठकीची शक्यता होती. मात्र विशेष अधिवेशन संपूनही मंत्रिमंडळ विस्तारावरुन बैठक झालेली नाही. काही दिवसातचं नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मंळवारी एकनाथ शिंदे ठाण्यात तर देवेंद्र फडणवीस हे मुंबईतच असल्याने कोणतीही भेट किंवा चर्चा न झाल्याने चर्चंना उधाण आले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी रात्री ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दोघांत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा भेट घेत जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. गृहमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष गृहमंत्रिपदावर ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT