Mahavikas Aghadi  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : लोकसभेत महायुतीला धोबीपछाड, आता विधानसभेसाठी काय रणनिती? आज 'मविआ'ची संयुक्त पत्रकार परिषद

Mahavikas Aghadi Press Conference : आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्रित पत्रकारपरिषद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत एकजूट दाखवून महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना मोठा दणका दिला. राज्यातील ४८ पैकी तब्बल ३१ जागा जिंकत मविआने जोरदार मुसंडी मारली. आता हीच एकी विधानसभेत राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्रित पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

दुपारी दोन वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणारे हे तिन्ही नेते विधानसभा निवडणुकीत कोणता नवा डाव टाकणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

महाविकास आघाडीच्या ‘पॉवर’ची धास्ती घेतलेल्या सत्ताधाऱ्यांचे देखील या पत्रकारपरिषदेवर लक्ष असणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आतापासून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. शरद पवार हे विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना हरवून राज्य काबीज करणार, असा पक्का निर्धार शरद पवार यांनी केला आहे. दुसरीकडे ३ महिन्यांत राज्यात सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल, असं शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच येत्या २७ तारखेपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Karlyache Kaap: कारल्याची कडू भाजी सोडा, बनवा कुरकुरीत काप; सोपी रेसिपी करा ट्राय

Operation Cy-Hunt : 'ऑपरेशन साय-हंट'! एकाच दिवशी २६३ गुन्हेगारांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Jio-Airtel लांब, आता BSNL ची एन्ट्री! मुंबई मेट्रो ३ मध्ये मोबाईल नेटवर्कची अडचण सुटणार का?

Trendy Blouse Designs For Bride: यंदा कर्तव्य आहे? मग 'या' ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्समध्ये तुमचा ब्राइडल लुक करा खास

SCROLL FOR NEXT