Devendra Fadnavis Challenge To Sharad Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आव्हान, म्हणाले...

Devendra Fadnavis Challenge To Sharad Pawar: महायुतीने आज पत्रकार परिषद घेत आतापर्यंत केलेल्या कामाबाबतचे रिपोर्टकार्ड सादर केले. या रिपोर्टकार्डद्वारे सरकारने केलेल्या कामाचा लेखाझोका दाखवण्यात आला आहे.

Priya More

मुख्यमंत्रीपदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अद्याप दोन्ही बाजूने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही. अशातच मुख्यमंत्रीपदावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांना आव्हान केले आहे. 'पवारसाहेब तुमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. माझं तुम्हाला आव्हान आहे.', अशा शब्दात त्यांनी थेट पवारांना चॅलेंज केले आहे. आज महायुतीने पत्रकार परिषद घेत आतापर्यंत केलेल्या कामाबाबतचे रिपोर्टकार्ड सादर केले. या रिपोर्टकार्डद्वारे सरकारने केलेल्या कामाचा लेखाझोका दाखवण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाबाबत सांगितले की, 'आमचं जवळपास जागावाटप झालं आहे. अगदी बोटावर मोजण्या इतकं जागा राहिल्या आहेत. कोणाचा उमेदवार कुठे स्ट्राँग आहे हे बघून आम्ही जागावाटप करतोय. स्थगिती सरकार गेल्यावर गती सरकार लोकांनी बघितले आहे. शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नावरून आम्ही त्यांचे वीजबिल माफ केले. दुष्काळग्रस्त भागतील शेतकऱ्यांना देखील जल सिंचन प्रकल्प माध्यमातून करण्यात आले आहे.'

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की,'वेगवेगळ्या क्षेत्रातील होमगार्ड, पोलिस पाटील मानधन देऊन त्यांना दिलासा देण्यात आला आहे. प्रत्येक समाजातील घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे विरोधीपक्ष 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं यावर टीका करत आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही दुप्पट करणार आहे असे ते सांगत आहेत. त्यासाठी पैसे आहेत का? उद्धव ठाकरे यांनी तर जाहीर सभेत स्पष्ट केलं की यांच्या योजना बंद करू. '

तसंच, 'ज्याचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हला कायदा व सुवस्था सांगत आहेत. जी कामे राहिले आहेत ती पुढच्या पाच वर्षांत करू. आता निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. काहींसाठी अलार्म झाला आहे. महायुती सरकारने दोन सव्वा दोन वर्षांत जे कार्य केले आहे त्याचे रिपोर्टकार्ड सर्वांमसोर आम्ही ठेवले आहे. ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने परिवर्तन करणाऱ्या योजना आणल्या. यामुळे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती सर्वांना कळाली.' , असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

SCROLL FOR NEXT