Akshay Shinde : अक्षय शिंदे याच्या वडिलांनी गृहमंत्री अमित शहा, फडणवीस यांना लिहिलं पत्र, केली 'ही' मागणी...

Akshay Shinde Father letter to Amit Shah And Devendra Fadnavis: अक्षय शिंदे याच्या वडिलांनी गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
अक्षय शिंदे याच्या वडिलांनी गृहमंत्री अमित शहा, फडणवीस यांना लिहिलं पत्र, केली 'ही' मागणी...
Akshay Shinde Father letter to Amit Shah And Devendra FadnavisSaam Tv
Published On

सुरज मसुरकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

बदलापूरमधील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर राजकरण चांगलंच तापलं आहे. यातच आता अक्षयच्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र लिहिलं आहे.

अण्णा शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात, अमित शहा यांच्याकडे स्वतःचे कुटुंब, वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले आहे, त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावे, कारण किरीट सोमय्या यांच्यापेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफियाडून आहे, असे पत्रात सांगून संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.

अक्षय शिंदे याच्या वडिलांनी गृहमंत्री अमित शहा, फडणवीस यांना लिहिलं पत्र, केली 'ही' मागणी...
Pune Crime News: एकटी असल्याचं पाहून घरात घुसला अन् 3 वर्षीय चिमुरडीवर केला अत्याचार; आई येत असल्याचं पाहून काढला पळ

अण्णा शिंदे यांनी पत्रात काय लिहिलं?

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा शिंदे म्हणाले आहेत की, ''मी आपणास नम्र पूर्वक कळवू इच्छितो की, माझा मुलगा अक्षय अण्णा शिंदे यांचा एन्काऊंटरचा बनाव रचून पोलिसांमार्फत राजकीय फायदा घेणेकामे हत्या करण्यात आलेली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका क्र. ४१०७/२०२४ ही न्यायप्रलंबित आहे. ही याचिका दाखल करण्याआधी व केल्यानंतर माझ्या व माझ्या परिवारातील सदस्यांना धमक्या येत आहेत.''

शिंदे यांनी पत्रात लिहिलं आहे की, ''प्रकरणातील वकील एडवोकेट अमित कटारनवरे हे आमची बाजू न्यायालयात मांडीत असल्याकारणाने त्यांच्या मुलीसोबत बलात्कार घडण्याची अपेक्षा काही लोकांनी समाज माध्यमांद्वारे व्यक्त केली आहे. तसेच माझे वकील एडवोकेट अमित कटारनवरे यांनी अधिवक्ता अधिनियम कलम 32 अन्वये विशेष परवानगी घेऊन नवी मुंबई येथील स्वप्निल सोनावणे ऑनर किलिंग प्रकरणात पीडित इसाम शहाजी सोनवणे यांची बाजू अनेक न्यायालयात मांडल्यानंतर त्यांच्यावर दोन वेळा 2017 रोजी प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्याबाबत सानपाडा पोलीस ठाणे, नेरूळ पोलीस ठाणे मुंबई नवी मुंबई येथे भा. द. वी. कलम 307 व इतर कलम अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.''

अक्षय शिंदे याच्या वडिलांनी गृहमंत्री अमित शहा, फडणवीस यांना लिहिलं पत्र, केली 'ही' मागणी...
Pune Crime News: एकटी असल्याचं पाहून घरात घुसला अन् 3 वर्षीय चिमुरडीवर केला अत्याचार; आई येत असल्याचं पाहून काढला पळ

अण्णा शिंदे पत्रात पत्रात म्हणाले आहेत की, ''या गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात तपासीक यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे संबंधित आरोपी मोकाट फिरत आहेत. नजीकच्या काळात आमचे वकील अमित कटारनवरे हे नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्यात अनुसूचित जमातीचे शेषराव दत्तात्रय जेठेवाड यांच्या वतीने त्यांच्या अॅट्रॉसिटी काय‌द्याअंतर्गत गुन्हा दाखल होणेकामी वजीराबाद पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांसमक्ष सदर गुन्ह्यातील आरोपींच्या साथीदारांनी नांदेड बाहेर माझे वकील अमित कटारनवरे कसे जातात, तेच आम्ही बघतो असे म्हणून जीवे ठार मारण्याची संबंधितांनी धमकी दिली. माझे वकील अमित कटारनवरे हे अनेक गुन्ह्यातील पिढीतांची बाजू न्यायालयात मांडीत असून तसेच ते अॅट्रॉसिटी (अत्याचारास प्रतिबंध) कायद्यातील किमान २० गुन्ह्यात पीडित आहेत. याबाबतची हकीगत माझे वकील अमित कटार नवरे यांनी केंद्रीय गृह विभाग तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात याआधी ईमेलद्वारे कळविले आहे.''

त्यांनी पत्रात शेवटी म्हटलं आहे की, ''माझे वकील अमित कटारनवरे यांचा परिवर तसेच मी व माझा परिवाराच्या जीवितास किरीट सोमय्या यांच्या तुलनेत अधिकचा धोका सत्ताधारी, पॉलिटिकल, माफिया व त्यांच्या चेले चपाट्यांकडून असल्यामुळे किरीट सोमय्याच्या तुलनेत अधिकचे संरक्षण प्रधान करावे, ही माझी नम्र विनंती.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com