Khadakwasla Constituency Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उमेदवार बदला तरच जागा जिंकू, पुण्यात उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. उमेदवारीवरून पुण्यामध्ये भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील सहाही जागांपैकी ५ जागांवर विद्यमान आनदारांनाच पसंती असल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे. काही भाजपचे नगरसेवक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यामध्येच उमेदवारीवरून नाराजी आहे. अशामध्येच खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच सुरू आहे.

भाजपच्या माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली. गेली १५ वर्षे नगरसेवक असताना आपण लोकांची काम केली आहेत. त्यामुळे मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे अशी इच्छा त्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. मंगळवारी पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत भाजपने यावेळी उमेदवार बदलला पाहिजे, तरच ही जागा आपण जिंकू अशी मागणी काही माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे आता भाजपचा खडकवासल्याचा उमेदवार कोण? पक्ष नेमकी कोणाला संधी देतोय. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय जामवाल, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी शहराध्यक्ष धीरज घाटे हे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kangana ranaut : खासदार कंगना रणौत यांना मोठा दिलासा; सेन्सॉर 'इमर्जन्सी'ला मिळाला ग्रीन सिग्नल, आता पडद्यावर कधी झळकणार?

Latur Politics : महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले, काँग्रेसचा भाजपवर हल्लोबोल

Maharashtra News Live Updates : महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक आकाऊंट हॅक

VIDEO : वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी

Railway IRCTC Share : रेल्वेची मोठी घोषणा अन् शेअरमध्ये अचानक झाली पडझड; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT