BJP MLA Ticket Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राम कदम, पराग शाह यांचा पत्ता कट? मुंबईत भाजप नवा डाव खेळणार? कुणाच्या नावाची चर्चा

BJP MLA Ticket Cut: मुंबईत भाजपच्या काही जागेवर उमेदवार बदली करण्याची शक्यता आहे. काही जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Priya More

गणेश कवाडे, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी भाजपकडून लवकरच जाहीर होणार आहे. या उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच भाजपच्या उमेदवारांच्या यादीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत भाजपच्या काही जागेवर उमेदवार बदली करण्याची शक्यता आहे. काही जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

वर्सोव्यात भारती लव्हेकरांऐवजी संजय पाण्डेय यांच्या नावाला पसंती आहे. घाटकोपर पश्चिममध्ये राम कदमांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सायनमध्ये तमील सेल्व्हन ऐवजी प्रसाद लाड आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. घाटकोपर पूर्वमध्ये पराग शाह यांच्याजागी प्रकाश मेहतांचे पुनर्वसन होणार आहे. तर बोरिवलीत सुनिल राणेंच्या जागी गोपाळ शेट्टींच्या नावाची चर्चा होत आहे.

बोरिवलीचे आमदार सुनिल राणेंचा पत्ता कट होणार असून या मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या दिल्लीतील बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली. गोपाळ शेट्टींच्या उमेदवारीवरून बैठकीत दोन नेत्यांमध्ये मतांतर झाले. लोकसभेत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापल्यानंतर त्यांचं पुर्नवसन करण्याची मुंबईतील नेत्यांनी विनंती केली.

मुंबईतील एका नेत्याचा गोपाळ शेट्टींसाठी आग्रह असल्याची माहिती आहे. बोरीवली विधानसभेबाबत कालच्या बैठकीत तोडगा निघालाच नाही. पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यास पक्षश्रेष्ठी यांची संमती आहे. त्यामुळे आता बोरीवलीमध्ये नेमकं कोणाला भाजप संधी देतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत मुंबईतील इतर मतदारसंघात नेमकी कोणाला संधी मिळते हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT