कल्याण पूर्व मतदारसंघाकडे यंदा सगळ्यांचे लक्ष लागून आहे. या मतदारसंघामध्ये भाजपने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर या मतदारसंघात आता महेश प्रकाश गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे एकूणच नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांमुळे महेश गायकवाड यांच्यासह मतदारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे .
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर नवी खेळी समोर आली आहे. भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. सुलभा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यामुळे महेश गायकवाड हे नाराज झाले. त्यांना पक्षाकडून तिकीट मिळेल अशी आशा होती. पण तिकीट न मिळाल्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महेश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
गणपत गायकवाड यांच्या नावाशी साधर्म्य असलेला गणपत चिमाजी गायकवाड यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांच्या नावात साधर्म्य असलेल्या महेश प्रकाश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघामध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार असल्यामुळे मतदान करताना मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.