Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: धनंजय बोडारे यांना उमेदवारी, कल्याण पूर्व मतदारसंघात ठाकरे गटात नाराजी

Kalyan East Constituency: धनंजय बोडारे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ठाकरे गटामध्ये नाराजी आहे. रमेश जाधव यांनी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. माजी महापौर रमेश जाधव यांनी या निवडीविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, स्थानिक उमेदवार देण्याची मागणी केली आहे. त्यांच्यासह ठाकरे गटातील अन्य कार्यकर्त्यांनीही बोडारे यांच्या उमेदवारीबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.

रमेश जाधव यांनी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'माझा एबी फॉर्म या नेत्यांनी गहाळ केला आणि बोडारे यांना दिला.' असा आरोप रमेश जाधव यांनी विनायक राऊत, गुरुनाथ खोत यांच्यावर केला आहे.

ठाकरे गटातील असंतुष्ट कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवार देण्याची मागणी केली आहे. रमेश जाधव यांनी ठामपणे सांगितले की, 'उमेदवार बदलला गेला नाही तर ते कठोर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे ठाकरे गटातील या विरोधामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.'

कल्याण पूर्व मतदारसंघावर ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला होता. ही जागा ठाकरे गटाच्या वाट्यावर गेल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच ठाकरे गटाने धनंजय बोडारे यांना उमेदवारी दिल्याने

ठाकरे गटात देखील असंतोष निर्माण झालाय. कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नाराज व्यक्त केला. एकूणच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर बंड थोपवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मिलिंद नरोटे यांना भाजपकडून गडचिरोलीतून उमेदवारी

Vastu Tips: धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ करेल मालामाला; करा 'हे' उपाय

Railway Rule: रेल्वे सुटल्यानंतर त्याच तिकीटवर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम

Nashik Shocking : नाशिकमध्ये माय-लेकासह मामाचा नदीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

Hill Station : उंच शिखर अन् चहूबाजूंनी जंगल, हिवाळ्यात 'या' हिल स्टेशनचं सौंदर्य पाहाच

SCROLL FOR NEXT