Jayant Patil On Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Jayant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांची भेट का घेतली? जयंत पाटील यांनी सर्वकाही सांगितलं

Jayant Patil On Devendra Fadnavis: जयंत पाटील यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या.

Priya More
  • जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती

  • मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं काय कारण होतं हे त्यांनी सांगितले

  • ही भेट ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणासाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले

  • या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच रंगल्या आहेत. या चर्चांदरम्यान शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेत जयंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांच्या भेटी झाल्या. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली. आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं खरं कारण काय ते सांगितलं. ही भेट नियोजित होती असं ते म्हणाले.

जयंत पाटील यांनी सांगितले की, ईश्वरपूर नगराध्यक्षांचे पद अपात्र ठरवल्याप्रकरणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. नगराराध्यक्षांव्यतिरिक्त कुठल्याच विषयावर चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीसांसोबत नियोजित भेट होती. अर्थमंत्रीपदाबाबत फडणवीस निर्णय घेतील. पटेल-तटकरे यांच्यासोबत माझी भेट नाही. मी ज्या हॉलमध्ये बसलो होतो तिथे कुणीच नव्हते. मुख्यमंत्र्यांची ५ ते १० मिनिटं भेट घेऊन मी तिथून निघून गेलो. भेटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी भेटायला गेलो.'

त्यांनी पुढे सांगितले की,'मी मुख्यमंत्री फडणवीसांना सातत्याने भेटलो नाही. माझ्या मतदारसंघात नराध्यक्षांना अपात्र ठरवलं गेलं ही एक समस्या होती. त्यामुळे माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणं गरजेचे होते. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना भेटीसाठी वेळ मागितला आणि त्यांनी दिला. मी मुख्यमंत्र्यांसोबत काही राजकीय चर्चा केल्या नाहीत.'

तसंच, दोन्ही राष्ट्रादीच्या विलिनीकरणाबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या नाहीत. आम्ही सर्व आमदार आणि खासदार शरद पवार यांच्यासोबत आहोत. माझ्या पक्षात कोणतेही घालमेल नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत मी आक्षेप घेणार नाही. रेवती सुळेंच्या लग्नावेळी पटेल-तटकरे भेटले होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT