Poladpur Tourism : पोलादपूरजवळील 'ही' ठिकाणं पावसाळ्यात होतात अधिकच सुंदर, एकदा तरी भेट द्याच

Shreya Maskar

प्रतापगड किल्ला

पोलादपूरपासून सुमारे १३ किमी अंतरावर ऐतिहासिक प्रतापगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा एक गिरीदुर्ग आहे. येथून निसर्गाची विहंगम दृश्ये आणि समृद्ध वारसा अनुभवता येतो.

Pratapgad Fort | google

मोरझोत धबधबा

खोपाड रस्त्यावर असलेला मोरझोत धबधबा एक सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात वन डे ट्रिपचे हे सुंदर लोकेशन आहे.

Morzhot Waterfall | google

मंगळगड किल्ला

मंगळगड किल्ल्ला लांगलगड असेही म्हणतात. डोंगराच्या माथ्यावर वसलेला हा शांत किल्ला दरीची विहंगम दृश्ये आणि ट्रेकिंगचा एक वेगळा अनुभव देतो.

Mangalgad Fort | google

केंबुर्ली धबधबा

महामार्गालगत असलेला केंबुर्ली धबधबा खूप लोकप्रिय आहे. तुम्ही येथे कुटुंबासोबत वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Kemburli Waterfall | google

वाळणकुंड धबधबा

पोलादपूर-महाड पट्ट्यातील हिरवाईने नटलेल्या परिसरात वाळणकुंड धबधबा वसलेला आहे. हा निसर्गरम्य नैसर्गिक जलाशय आणि धबधब्याचा परिसर आहे.

Valankund Waterfall | google

नाणेमाची धबधबा

पोलादपूरजवळील नाणेमाची धबधबा पावसाळ्यात फिरण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे. जो पावसाळ्यातील धुक्याने वेढलेल्या वातावरणासाठी आणि उंच कड्यावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे प्रसिद्ध आहे.

Nanemachi Waterfall | google

चंद्रगड ट्रेक

चंद्रगड ट्रेक हा पठाराच्या कडेला असलेला एक खडकाळ गिरीदुर्ग आणि हायकिंग मार्ग आहे. ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल

Chandragad Trek | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : कोकणच्या सौंदर्याची झलक पाहायची असेल तर मुंबईजवळील ‘हे’ ठिकाण नक्की फिरा

Mumbai Beach | AI PHOTO
येथे क्लिक करा...