Shreya Maskar
पावसाळ्यात मुंबईजवळ कुटुंबासोबत वीकेंड प्लान करायचा असेल तर अलिबाग हे बेस्ट ऑप्शन आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते.
अलिबाग कोकण प्रदेशातील रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. जे मुंबईपासून दक्षिणेस सुमारे ९६ किलोमीटर अंतरावर आहे.
अलिबाग निळेशार समुद्रकिनारे, ऐतिहासिक जलदुर्ग आणि ताज्या कोकणी सी-फूडसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा असेल तर नागाव आणि काशीद बीच बेस्ट आहेत.
अलिबाग बीच, नागाव बीच, किहिम बीच आणि समुद्रात वसलेला ३०० वर्षे जुना कुलाबा किल्ला यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
मुसळधार पावसानंतर सिद्धेश्वर आणि गारंबीसारखे हंगामी धबधबे पूर्ण वेगाने वाहू लागतात. तसेच येथे कनकेश्वर जंगल देखील आहे. जे दाट हिरवाई आणि ओल्या मातीच्या सुगंधाने वेढलेल्या टेकड्यांवरून ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
खवळलेल्या राखाडी रंगाच्या समुद्राने वेढलेला हा भव्य जलदुर्ग अतिशय प्रभावी दिसतो; मात्र, बोटींची सेवा हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असते.
पावसाळ्यात कोरलाईच्या खडकाळ किनाऱ्यावर गवताची हिरवीगार कुरणे आणि रानफुले बहरलेली दिसतात. तुम्ही अलिबागला गेल्यावर छान फोटोशूट करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.