Jayant Patil  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, भरसभेत जयंत पाटील यांची शरद पवारांकडे मागणी

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पद सोडण्याची मागणी केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मागणी केली.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापनदिन आज पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पद सोडण्याची मागणी केली. 'प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा.', अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे शरद पवार यांच्याकडे केली. जयंत पाटील यांनी जरी मागणी केली असली तरी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विनंतीला विरोध केला. शेवटी निर्णय शरद पवार यांनी घ्यावा अशी विनंती जयंत पाटील यांनी केली. कार्यकर्त्यांनी यावेळी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी भाषण करताना जयंत पाटील भावुक झाले.

नव्या चेहऱ्यांना संधी द्या असे म्हणत जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदातून मला मुक्त करा अशी मागणी केली. जयंत पाटील यांनी भाषण करताना सांगितले की, 'अनेक तरुणांना संधी दिली पाहिजे. मला साहेबांनी सात वर्षे काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. आपल्याला पुढे जायचं आहे.'

जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'जयंत पाटील यांनी आठ- दहा वर्षे अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. त्यांनी सांगितलंय की नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही त्याला विरोध केला. जयंत पाटलांबाबत निर्णय घेताना पक्षातील सर्वांशी बोलून निर्णय घेऊ.'

तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, 'जयंत पाटील यांनी पत्र दिलं राजीनामा दिला नाही. प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही तर नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीचा प्रश्न येतोच कुठं. जयंत पाटलांचं भाषण झालं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. दिल्लीवरून परत आल्यावर त्यावर चर्चा करेल. जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. एवढे वर्षे प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली. त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही. त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील तर ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यावर विचार केला जाईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Union Budget 2026: यंदा देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? वाचा तारीख आणि वेळ

Buldhana : पालकमंत्री मराठा असल्याची लाज वाटते ,महेश डोंगरेंचा संताप; जिजाऊ जन्मोत्सवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

Navi Mumbai: नवी मुंबईत शिंदेंच्या शिंवसेनेला खिंडार, बड्या नेत्यासह २० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Oscar: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका; 'कांतारा चॅप्टर १' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्करच्या स्पर्धेत

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन

SCROLL FOR NEXT